ब्रॅण्डिंग (Branding)

लेख क्र. 1 – ब्रॅण्डिंग म्हणजे काय? ब्रॅण्डिंगची आवश्यकता का आहे?


व्यावसायिक आयुष्यात अनेक वेळेस ब्रँड, ब्रॅण्डिंग, ब्रँड मॅनेजमेंट, ब्रँड स्ट्राटेजी, हे व असे शब्द रोज कानावर पडत असतात. पण दुर्दैवाने अनेक व्यावसायिक मात्र यांची संपूर्ण माहिती घेत नाही. चला! थोडे मागे जाऊन पाहू…

तुम्ही व्यावसायिक आयुष्यात प्रवेश करण्याचा विचार करतात. एखादी आयडिया (संकल्पना) घेऊन तुम्ही ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतात. ते करत असताना तुम्ही स्वतःची फर्म/कंपनी स्थापन करतात. आणि सगळे सरकारी कामकाज पूर्ण होऊन बँक अकाऊंट सुरू होते, त्यानंतर सुरुवात होते कंपनीला किंवा फर्मला एक चेहरा, एक ओळख देण्याची…

तुम्ही चांगल्या डिझायनरकडे जाऊन लोगो व इतर सामग्री, जसे की लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड्स बनवून घेतात. फारफार तर त्यातून निवडक लोगो ट्रेडमार्क होतात. काही जणांना वाटते हीच ब्रॅण्डिंग आहे. नाही! ब्रॅण्डिंगची खरं तर आता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तुम्ही जे केलं ते तुमच्या फर्म/कंपनीचं आस्तित्व तयार करण्यासाठी केलं. इथे ब्रॅण्डिंग संपलेली नाही, तर इथे फक्त सुरुवात झाली आहे.

ब्रॅण्डिंग म्हणजे ओळख निर्माण करणे. ब्रॅण्डिंग म्हणजे तुमच्या ग्राहकांना इतरांपेक्षा वेगळा अनुभव देणे. ब्रॅण्डिंग म्हणजे तुमच्या ग्राहकांच्या मनात तुमचे स्थान निर्माण करणे. ब्रॅण्डिंग म्हणजे तुमची रिकॉल व्हॅल्यू (Recall Value) तयार करणे. ब्रॅण्डिंग ही कंपनीच्या किंवा फर्मच्या मालकासहित प्रत्येक कर्मचाऱ्याने जगण्याची गोष्ट आहे. ब्रँड तयार करायला महिने किंवा वर्षदेखील लागू शकतात. टाटा, रिलायन्स, अमेझॉन, फ्लिपकार्ट, गुगल हे ब्रँड एका रात्रीत तयार झालेले नाही. टाटा म्हणजे विश्वास, हे लोकांच्या मनात ठसवण्यासाठी टाटाच्या कित्येक पिढ्या खर्ची पडल्या. पण आता डिजिटल क्रांतीमुळे तुमचा वेळ कमी झालेला आहे.

“ठीक आहे! हे समजले, मग नक्की ब्रँड तयार करण्याची गरजच काय? आपला व्यवसाय नियमित आणि सुरळीत सुरू आहे, मग असे रिकाम्या (?) गोष्टींवर वेळ कशाला घालवावा?” असे अनेक प्रश्न काहींच्या डोक्यात आले असतील. तर त्याची कारणेदेखील सांगतो.

  1. ब्रॅण्डिंग तुमच्या व्यवसायाची पत वाढवते. (पत म्हणजे व्हॅल्यू (value) किंवा वर्थ (worth))
  2. ब्रॅण्डिंगमुळे तुम्हाला निष्ठावान ग्राहक मिळतात.
  3. ब्रॅण्डिंगमुळे तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा संतोष (satisfaction) तयार होतो, जो त्यांना चांगले काम करायला उद्युक्त करतो. तसेच तुमचे कर्मचारी तुमच्याकडे टिकून राहतात.
  4. ब्रॅण्डिंगमुळे तुमची मार्केटमध्ये विश्वासार्हता वाढते.
  5. ब्रॅण्डिंगमुळे तुमची स्पर्धा कमी होते.

ही काही निवडक कारणे ज्यामुळे ब्रॅण्डिंग व्यवसायासाठी उपयुक्त आहे, हे सिद्ध होते. पण फक्त इतकेच ब्रॅण्डिंग आहे का? तर नाही. ब्रॅण्डिंग हा विषय अजून खोलात जाऊन अभ्यासावा लागतो. पण छोट्या व्यवसायाला स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर ब्रॅण्डिंग अत्यावश्यक आहे.

पुढच्या काही भागांमध्ये आपण थोडे खोलात जाऊन ब्रॅण्डिंगचा अभ्यास करू, तसेच ब्रँड प्रत्यक्षात कसा तयार करायचा हेदेखील जाणून घेऊ.

आपल्या काही प्रतिक्रिया असतील, तर नक्की कळवा.

Ganesh Naaik
(Online Business Growth Strategist)
Mob: +91-8822757575

Digital Marketing
What are important things in Digital Marketing?
Books
NEW RELEASE: From Start to Finish: The Art of Building a Strong Digital Brand
Digital Marketing
Exploring the Strength of Growing Regional Content in 2024
There are currently no comments.