ब्रॅण्डिंग (Branding)

लेख क्र. 2 – ब्रॅण्डिंगचे वेगवेगळे प्रकार


ठीक आहे! पहिल्या लेखात आपण ब्रॅण्डिंगचे बेसिक्स आणि ब्रॅण्डिंग का अत्यावश्यक आहे, हे जाणून घेतले. छोट्या किंवा मोठ्या, सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना ब्रॅण्डिंगचे काय फायदे होतात, हे देखील समजून घेतले.

आता थोडे मुख्य गाभ्याकडे आपण वळणार आहोत. पण प्रत्येक टप्प्यावर काही महत्त्वपूर्ण बेसिक माहिती समजून घेणे आवश्यक असेल.

आज आपण ब्रॅण्डिंग करण्याचे वेगवेगळे प्रकार जाणून घेणार आहोत. ब्रॅण्डिंग कशी करावी, या प्रश्नाच्या उत्तराची ही सुरुवात आहे. ब्रँडचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात, ते देखील येणाऱ्या भागात समजतील.

भारतीय अथवा जागतिक मार्केटमध्ये ब्रॅण्डिंग करण्याचे मुख्यतः 8 प्रकार आहेत. या शिवाय अनेक प्रकार आहेत, पण समजायला सोपे आणि सर्वत्र दिसणारे म्हणून हे मुख्य 8 प्रकार आपण विचारात घेऊ.

  1. वैयक्तिक (पर्सनल) ब्रॅण्डिंग: आधीच्या काळात एका व्यक्तीने ब्रँड असणे, आजच्यासारखे प्रचलित नव्हते. पण काळाच्या ओघात एक एक व्यक्तीचा ब्रँड बनू लागला. पर्सनल ब्रॅण्डिंग म्हणजे एका व्यक्तीची समाजात एक विशिष्ट आणि अर्थपूर्ण ओळख बनवणे. याचे सगळ्यात मोठे उदाहरण, म्हणजे श्री. विवेक बिंद्रा (बिझनेस ट्रेनर). यांनी स्वतःचा ब्रँड इतका विकसित केला की यांची कंपनी ही फक्त श्री. विवेक बिंद्रा यांच्या नावावर चालते. कोणीही एक व्यक्ती स्वतःची पर्सनल ब्रॅण्डिंग करू शकतो.
  2. कॉर्पोरेट ब्रॅण्डिंग: म्हणजेच एखाद्या व्यवसायाने किंवा इंडस्ट्रीने स्वतःची ओळख तयार करणे. उदा. टाटा समूहाने कॉर्पोरेट ब्रॅण्डिंग केलेली दिसून येते. (त्यांचे अनेक इतर ब्रँड्स आहेत, पण आपण टाटा समूह (Tata Group) बद्दल बोलत आहोत.). इतरही अनेक उदाहरणे देता येतील.
  3. उत्पादनाची (प्रॉडक्ट) ब्रॅण्डिंग: जेव्हा एखादी व्यक्ती किंवा कंपनी, ही प्रोडक्टवर फोकस करून ब्रॅण्डिंग करते, तेव्हा त्याला प्रॉडक्ट ब्रॅण्डिंग म्हटले जाते. इथे कंपनीचे नाव किंवा कंपनीचा ब्रँड महत्त्वाचा नसतो. याचे आपले मराठमोळे उदाहरण म्हणजे बाकरवडी. कोण आठवले? पुणे येथील चितळे बंधू मिठाईवाले. बाकरवडी म्हणताच क्षणी चितळे यांचे दुकान डोळ्यासमोर दिसायला लागते, कारण त्यांनी या एका प्रॉडक्टची योग्य प्रकारे ओळख निर्माण केली, व त्याचा फायदा त्यांना त्यांच्या व्यावसायिक ब्रॅण्डिंगमध्ये झालाच असेल.
  4. सेवेची (सर्व्हिस) ब्रॅण्डिंग: एखाद्या सेवेमुळे किंवा सेवेमध्ये केलेल्या थोड्याशा बदलामुळे आपली ओळख निर्माण झाली, तर त्याला सर्व्हिस ब्रॅण्डिंग म्हटले जाते. उदा. 30 मिनिटात फ्री पिझ्झा डिलिव्हरी. मूळ सेवेत केलेल्या एका बदलामुळे सर्व्हिस ब्रँड मजबूत व्हायला मदत झाली.
  5. रिटेल (Retail) ब्रॅण्डिंग: रिटेल क्षेत्रात किरकोळ व्यवसायात ओळख निर्माण केली, तर त्याला रिटेल ब्रॅण्डिंग म्हटले जाते. याचे सध्याचे उदाहरण म्हणजे अमृततुल्य आणि D-Mart.
  6. कल्चरल आणि जियोग्राफिक ब्रॅण्डिंग: हे दोन ब्रॅण्डिंग वेगवेगळे असले, तरीही यांच्यात साम्य असल्याने हा एक प्रकार म्हणून गृहीत धरले आहे. या प्रकारचे ब्रॅण्डिंग मुख्यतः टुरिझम (Tourism) इंडस्ट्रीमध्ये केले जाते. पण इतर इंडस्ट्री देखील योग्य असेल तर या प्रकारांचा विचार करू शकतात. काश्मीर टुरिझम हे याचे उत्तम उदाहरण. लोक काश्मीरला जाऊन काश्मिरी कल्चरप्रमाणे जेवण करतात, व कपडे परिधान करून फोटो काढून घेतात. इतर क्षेत्रांची उदाहरणे बघायची झाल्यास आपला सर्वांचा आवडता आणि उत्तम म्हटला जाणारा आसामचा चहा, आयफेल टॉवर (पॅरिस), गेट वे ऑफ इंडिया (मुंबई), इंडिया गेट (दिल्ली), हंपी (कर्नाटक), छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला ही सर्व जियोग्राफिक ब्रॅण्डिंगची उदाहरणे. तर म्हैसूरचे सिल्क व चंदन, येवला येथील पैठणी, चनापट्टाना (कर्नाटक) येथील भारतीय पारंपरिक खेळणी, ही कल्चरल ब्रॅण्डिंगची उदाहरणे झाली.
  7. ऑफलाईन (offline) ब्रॅण्डिंग: ब्रॅण्डिंगसाठी इंटरनेट व डिजिटल मीडिया सोडून इतर मार्गांनी ओळख निर्माण करण्यासाठी लोकांपर्यंत जाणे याला ऑफलाईन ब्रॅण्डिंग म्हटले जाते. म्हणजेच तुमचा किंवा तुमच्या व्यवसायाचे ऑफलाईन आस्तित्व.
  8. ऑनलाईन (online) ब्रॅण्डिंग: याचाच अर्थ डिजिटल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून ओळख निर्माण करणे.

हे होते ब्रॅण्डिंग करण्याचे वेगवेगळे प्रकार. पण एक ब्रँड बनवायला किंवा ब्रॅण्डिंग करायला फक्त एकच प्रकार महत्त्वाचा असतो का? तर याचे उत्तर खूपदा ‘नाही’ हे असते. अनेकदा ब्रॅण्डिंग स्ट्रटेजी ही दोन किंवा जास्त ब्रॅण्डिंगचा समावेश करून करावे लागते. अनेकदा ही स्ट्रटेजी सध्याच्या मार्केट ट्रेण्डप्रमाणे बदलावावी लागते, किंवा अपग्रेड करावी लागते. म्हणून ब्रॅण्डिंग करताना एक पेक्षा स्ट्रटेजी वापरलेल्या आपण पाहू शकता.

आपणास ब्रॅण्डिंग समजून घ्यायची असेल तर एक सोपी गोष्ट करावी, एखाद्या कंपनीला/व्यक्तीला/प्रसिद्ध ठिकाणाला पाहताच त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी काय काय केले असेल, याचा अंदाज बांधून मागोवा घ्यावा. यामुळे आपल्याला ब्रॅण्डिंग समजण्यास सोपे जाईल.

वर दिलेल्या 8 प्रकारांबद्दल आपण पुढे अधिक माहिती घेणार आहोत. तसेच त्या त्या प्रकारचा ब्रँड तयार करण्यासाठी काय काय कृती करावी लागेल, याची देखील मी माहिती देणार आहे.

आपल्या काही प्रतिक्रिया किंवा प्रश्न असतील, तर नक्की कळवा.

Ganesh Naaik
(Online Business Growth Strategist)
Mob: +91-8822757575

Digital Marketing
Preparing Your Business for the Upcoming Festive Season and Diwali 2023: A Digital Marketing Guide
Digital Marketing
What are important things in Digital Marketing?
Digital Marketing
Exploring the Strength of Growing Regional Content in 2024
There are currently no comments.