ब्रॅण्डिंग (Branding)

लेख क्र. 3 – ब्रॅण्डिंगची सुरुवात


ब्रॅण्डिंगचे प्रकार पाहिल्यावर आता आपण खरोखर ब्रॅण्डिंग करायला सुरुवात करत आहोत.

तुम्ही कोणताही व्यवसाय करताना काही प्रोडक्ट/सर्व्हिस लोकांना देण्यासाठी व्यवसाय सुरू करतात. पण अनेकदा हे करताना एक मोठी गल्लत झालेली पाहायला मिळते. मला अमुक अमुक गोष्ट चांगली करता येते, मग मी त्याच गोष्टीचे व्यवसायात रूपांतर करतो, हीच ती गल्लत. पण अनेक मित्र विचारतील, की यात गल्लत काय?

तर खरा प्रश्न आहे, तुम्ही जिथे किंवा ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू करणार आहात, तिथे तुम्ही विकणार असलेल्या गोष्टीची गरज आहे का? भारत हा बहुविध देश आहे. इथे थोड्या थोड्या अंतरावर संस्कृती बदलते. त्यामुळे इथे गरजा देखील कमी-अधिक होत असतात. त्यामुळे भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात मार्केट रिसर्च करूनच कोणीही व्यवसाय सुरू करावा.

“मार्केट रिसर्च” याचा ब्रॅण्डिंगसोबत काय संबंध? तर त्याचे उत्तर असे आहे की आपण मार्केट रिसर्च करतो, म्हणजे मार्केटच्या गरजा, मार्केटमध्ये असलेले लोक, मार्केटमध्ये असलेली स्पर्धा, मार्केटची मागणी आणि मार्केटच्या अश्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा अभ्यास करतो. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये तुमची सेवा/वस्तू खरेदी करणारे लोक. हे लोक म्हणजे तुमचा “टार्गेट ऑडीयंस”. याचा सरळ सरळ अर्थ असा की, तुम्ही यापुढे व्यवसायात जे काही कराल, ते या तुमच्या “टार्गेट ऑडीयंस”साठीच करणे अपेक्षित आहे. जी जाहिरात कराल ती या “टार्गेट ऑडीयंस”ला आकर्षित करेल, समजेल आणि तुमच्याकडून सेवा/वस्तू विकत घेण्यासाठी उद्युक्त करेल अशीच असावी. तुमचे व्यवसायाचे ठिकाण, तुमच्या ऑफिस/दुकानाचे इंटेरियर, तुमच्या व्यवसायाची टॅगलाईन, लोगो, व्हिजन, मिशन, बोर्डची डिझाईन, तुमच्या कोअर व्हॅल्यू, तुमची वेबसाईट, तुमचे मार्केटिंग मटेरियल व कॅम्पेन, तुमच्या प्रॉडक्टचे पॅकेजिंग, तुमची टेक्नोलॉजी, तुमची खासियत (USP – Unique Selling Proposition), तुमची सेवा/वस्तू देण्याची आणि तुमच्या ग्राहकाने वस्तू स्विकारण्याची पद्धत, तुमच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक, तुमच्या कर्मचाऱ्यांचे ग्राहकांसोबतचे वागणे-बोलणे, कर्मचाऱ्यांचा पेहराव, व्यावसायिक जबाबदाऱ्या किंवा दायित्व, तुमच्या सेवा/वस्तूची ऑर्डर देण्यापासून ते ती सेवा/वस्तू ग्राहकाच्या हातात मिळेपर्यंतचा वेळ, फीडबॅक सिस्टिम्स, अश्या अनेक अनेक गोष्टी या तुमच्या “टार्गेट ऑडीयंस” वर अवलंबून असतात.

एखादे प्रॉडक्ट कितीही छान असेल, पण ते प्रॉडक्ट टार्गेट ऑडीयंसला आवडत नसेल, किंवा समजत नसेल, तर तो व्यवसाय खूप लवकर धोक्यात येतो, आणि व्यावसायिक अयशस्वी झाल्याचे कारण सांगताना डिमांड नव्हती, मार्केटमध्ये मंदी होती, लोकांना चांगल्या गोष्टी आवडत नाहीत, लोकांना टेस्ट नाही, स्पर्धक मोठा आहे, खूप स्पर्धा आहे, व्यवसाय करणे सोपे नाही, व्यवसाय माझ्या रक्तात नाही, मला व्यवसाय जमत नाही, अशी व असेच संदर्भ असलेली कारणे देतो.

आज या एकच विषयावर आपण थांबणार नाही आहोत. आपल्याला थोडे अजून पुढे जायचे आहे.

तुम्हाला माहित आहे का, की टार्गेट ऑडीयंसचे मुख्य चार प्रकार आहेत:

  1. कंझ्युमर (Consumer) – जो मुख्यतः तुमच्या वस्तू/सेवेचा लाभ घेतो किंवा आस्वाद घेतो.
  2. बायर (Buyer) – जो तुमची वस्तू/सेवा खरेदी करून कंझ्युमरला प्रदान करतो.
  3. इन्फ्ल्यून्सर (Influencer) – जो तुमची वस्तू/सेवा बायरला खरेदी करण्यासाठी उद्युक्त करतो.
  4. डिसिजन मेकर (Decision Maker) – जो तुमची वस्तू/सेवा खरेदी करण्यात निर्णायक असतो.

काही उदाहरणांद्वारे हे सर्व प्रकार समजावून घेऊ.

  1. लहान मुलांसाठी त्यांच्या वडिलांनी आईस्क्रीम खरेदी केले. तर लहान मुले ही कंझ्युमर तर वडील हे बायर गृहीत धरले जातील.
  2. घर खरेदी करताना रियल इस्टेट कन्सल्टंटच्या सांगण्यावरून नवरा – बायको घर पाहायला गेले. नवरा म्हणजे कर्ता पुरुष हा मुख्य खरेदीदार आहे. पण घर खरेदी करताना त्याच्या सोयी, सुविधा, घराची जागा, इंटेरियर, फ्लोअर प्लॅन यांचा निर्णय तसेच घर खरेदी करायचे की नाही याचादेखील निर्णय बरेच वेळेस बायको म्हणजेच त्या घरातील कर्ती स्त्री घेते. यात नवरा हा बायर, रियल इस्टेट कन्सल्टंट हा इन्फ्ल्यून्सर, तर बायको डिसिजन मेकर आहे.
  3. सरकारी/सार्वजनिक कामकाजात Purchase Order वर सही करणारा ऑफिसर हा डिसिजन मेकर असतो. काही वेळेस त्याच्या हाताखालील कर्मचारी हे इन्फ्ल्यून्सरच्या भूमिकेमध्ये असतात, जे साहेबाना सांगून तुम्हाला काम मिळवून देतात. तर त्या वस्तू/सेवाचा लाभ घेणारा कंझ्युमर हा वेगळा असू शकतो, अनेकदा कंझ्युमर ही जनता असते.

काही ठिकाणी हे चारही प्रकार आपणास अनुभवायला मिळतील, काही ठिकाणी मिळणार नाहीत. आपणास टार्गेट ऑडीयंसचे प्रकार आता समजले असतील. अनेक वेळेस आपण हा विचारच करत नाही, फक्त बेछूट मार्केटिंग करत जातो, आणि रिझल्ट आला नाही की निराश होतो. ही निराशा टाळण्यासाठी ब्रॅण्डिंगमध्ये मुख्य पायरी म्हणून “टार्गेट ऑडीयंसची निवड” महत्त्वाची ठरते.

आपला टार्गेट ऑडीयंस कोणता याचा नक्की विचार करा. कारण कदाचित आजपर्यंत उत्तर न सापडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे ही पायरी देऊन जाते.

Ganesh Naaik
(Online Business Growth Strategist)
Mob: +91-8822757575

Digital Marketing
What are important things in Digital Marketing?
Digital Marketing
Preparing Your Business for the Upcoming Festive Season and Diwali 2023: A Digital Marketing Guide
Books
NEW RELEASE: From Start to Finish: The Art of Building a Strong Digital Brand
There are currently no comments.