मागील भागात आपण टार्गेट ऑडियन्सचे महत्व पाहिले. या भागात आपण बहुतांशी दुर्लक्षित, नेहमी इथून तिथून कॉपी केला जाणारा भाग म्हणजेच व्हिजन, मिशन आणी कोअर व्हॅल्यूचे महत्व बघणार आहोत.
तुम्हाला माहित आहे का, की ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, हे ब्रॅण्डिंगचे प्रमुख घटक आहेत. तसेच अतिशय महत्वाचे देखील आहेत. आपला ब्रँड लोकांच्या मनात काय आणी कशी जागा बनवणार हे या व्हिजन, मिशन आणी कोअर व्हॅल्यूवर् अवलंबून आहे.
चला तर मग, आज व्हिजन स्टेटमेंटचे महत्व आणी त्याचे ब्रॅण्डिंग मधील स्थान जाणून घेऊ:
व्हिजन (Vision): याचा शब्दश: अर्थ होतो, ‘दृष्टी’. पण व्यवसायात त्याचा अर्थ ‘स्वप्न’ असा देखील घेता येतो. आपण व्हिजनचा अर्थ ‘स्वप्न’ असा घेऊन बोलणार आहोत.
व्हिजन स्टेटमेंट म्हणजे काय?
हे तुमच्या कंपनी किंवा व्यवसायाशी संबंधित असे वाक्य असते जे तुमच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या सर्व लोकांना तुम्हाला भविष्यामध्ये (साधारणपणे 5-10 वर्षे किंवा त्याहून जास्त वेळ) काय साध्य करायचे आहे, तुमची कंपनी किंवा तुमचा व्यवसाय भविष्यात कोणत्या पातळीवर असेल, कसा दिसत असेल आणी काय साध्य करत असेल याचे वर्णन करणारे असते.
तुमच्या व्यवसायाचे व्हिजन स्टेटमेंट हे तुम्ही आज काय करता आहात, आणी भविष्यात काय करणार आहात याचा पाया आहे. म्हणून व्हिजन स्टेटमेंट अतिशय काळजीपूर्वक, पूर्णपणे विचार करून, गरज लागल्यास व्यावसायिक समुपदेशकांची मदत घेऊनच बनवले गेले पाहिजे. व्हिजन स्टेटमेंट कॉपी करणे टाळावे.
व्हिजन स्टेटमेंट का महत्वाचे आहे?
- व्हिजन स्टेटमेंट हे तुमच्या व्यावसायाचा “का?” म्हणजेच why याचे वर्णन करते.
- व्हिजन स्टेटमेंट तुमचे कर्मचारी, सहकारी आणी तुमच्या व्यावसायिक नेटवर्कमधील लोक यांना तुमच्या व्यावसायाचे ध्येय सांगते, ज्याने तुमच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला काय करायला हवे, याचेदेखील आकलन होते.
- व्हिजन स्टेटमेंट हे भविष्यदर्शक असते, त्यामुळे त्यात आवड आणी ध्येय गाठण्याची प्रेरणा असते.
- व्हिजन स्टेटमेंट तुमच्या व्यवसायाची संस्कृती आणी मूळ मूल्ये (core values) यांच्यासोबत समरस असते.
- व्हिजन स्टेटमेंट हे भविष्यातील व्यावसायिक फायदा आणी सुधारणा हे लक्षात घेऊन बनवलेले असते.
- व्हिजन स्टेटमेंट हे आपला व्यवसाय का आस्तित्वात आहे, आणी व्यवसाय भविष्यात कोणत्या पातळीवर राहील या प्रश्नांची उत्तरे देणारे असते.
आपणास व्हिजन स्टेटमेंटचे महत्व समजले असेलच. पण एक सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे हे फक्त बनवायचे म्हणून बनवू नये. तर व्हिजन स्टेटमेंट हे त्या व्यवसायाने, मालकाने आणी कर्मचाऱ्यांनी रोज जगले पाहिजे. गरज असेल तर रोज व्यवसायाची उलाढाल सुरु करताना मालकासहित सर्वांनी या व्हिजन स्टेटमेंटची उजळणी करावी, आणी त्यात जे लिहिले असेल त्यासाठी जगावे.
व्हिजन जगायचे असेल तर आणी तरच व्हिजन स्टेटमेंट बनवावे, अन्यथा बनवू नये, असे मी म्हणतो.
पुढील लेखामध्ये मिशन स्टेटमेंट व व्यावसायिक मूल्यांवर चर्चा करूयात.
Ganesh Naaik
(Online Business Growth Strategist)
Mob: +91-8822757575
Comments