ब्रॅण्डिंग (Branding)

भाग 5: ब्रॅण्डिंगमध्ये कंपनीच्या मिशन स्टेटमेंटचे महत्व


मागील भागात आपण व्हिजन स्टेटमेंट व त्याचे महत्व पाहिले. त्यानंतर वेळ असते ती मिशन स्टेटमेंटची… व्हिजन स्टेटमेंट हे तुमच्या कंपनीला भविष्यात कुठे जायचे आहे हे सांगते, तर मिशन स्टेटमेंट कसे जायचे हे सांगते.

व्हिजन आणी मिशन हे दोन्ही कंपनीला अनुसरून आणी एकमेकांना पूरक असावे. तसेच तुमच्या रोजच्या कामामध्ये हा व्हिजन आणी मिशन स्टेटमेंटचा उपयोग व्हावा, हे अपेक्षित असते.

व्हिजन आणी मिशन स्टेटमेंट मधील एक महत्वाचा फरक म्हणजे व्हिजन हे कंपनीचे भविष्य दाखवते, तर मिशन हे कंपनीचे वर्तमान आणी कंपनीची कार्य संस्कृती दाखवते.

उदा. एक साधे उदाहरणं घेऊ. एक ई-कॉमर्स कंपनी आहे, त्या कंपनीचे व्हिजन् आहे, “जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनणे” तर मिशन स्टेटमेंट असायला हवे, “सोप्यात सोप्या पद्धतीने ग्राहकांना खरेदीसाठी सर्वात कमी दरामध्ये आणी जास्तीत जास्त पर्याय देणे.”

यातील संबंध समजून घ्या. जगातली सर्वात मोठी बनायला त्यांना काय करायचे आहे, हे मिशन स्टेटमेंटमध्ये असायला हवे.

तुमच्या कंपनीचे व्हिजन आणी मिशन स्टेटमेंट्स एकदा बघून घ्या. व्हिजन आणी मिशन स्टेटमेंट इकडून तिकडून कॉपी करणे अतिशय अयोग्य आहे, कारण यात तुमची स्वतःची स्वप्ने आणी ते स्वप्न पूर्ण करायला तुम्ही घेत असलेली मेहनत दिसली पाहिजे.

पुढच्या भागामध्ये आपण आणखी एका मजेदार पण अश्याच तुमच्या व्यवसायासाठी महत्वाच्या असूनदेखील कॉपी होणाऱ्या गोष्टीबद्द्दल बोलणार आहोत.


Ganesh Naaik
(Online Business Growth Strategist)
Mob: +91-8822757575
Web: www.ganeshnaaik.com

Digital Marketing
What are important things in Digital Marketing?
Digital Marketing
Exploring the Strength of Growing Regional Content in 2024
Books
NEW RELEASE: From Start to Finish: The Art of Building a Strong Digital Brand
There are currently no comments.